महाराष्ट्र संवाददाता सचिन एलिंजे:नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळ असलेल्या कोकण खेड गावात येथील कु. पूनम अनिल एलिंजे हिची ही कहाणी..! नुकतंच नाशिक ग्रामीण येथे कु. पूनम एलिंजे पोलिस दलात भरती झाली आहे. पूनम लहान असतांनाच पोलिस बनण्याची इच्छा होती.दोन मोठ्या मोठ्या बहीणी सोबत एक भाऊ, आणि आई वडील. वडील शेतकरी..! पूनम चे आई वडील शेतात ते मेहनत करून आपला संसाराचा गाडा हाकत होते.
पूनम ला साथ आई वडिलांची यांची होतीच. तसेच जनसामान्यांत त्यांच चांगलं नावं होत होतं. पूनम पोलिस बनण्याचं स्वप्न व इच्छा होती. ती प्रयत्न करत होती. तसेच तिच्या बहिणी आणि भावाकडून मदतही होत होती. पण पहिल्या प्रयत्नात थोडक्यात संधी हुकली. पण पूनम थकली नाही. हिम्मत हारली नाही. आणखी हिमतीने मैदानात उतरली.अग्निपंख पोलिस भरती अकॅडमीने पूनम मेहनत व जिद्द पाहून पूनम प्रशिक्षणासाठी त्यांच्या अकॅडमी मध्ये प्रवेश दिला. ती सांगते माझ्या गुरुवर्यामुळे आज मी खऱ्या अर्थाने ही लढाई पूर्ण केली व त्याचा पुरेपुर फायदा करून घेत जिद्दीनं प्रशिक्षण पुर्ण केलं. नाशिक ग्रामीण येथे पोलिस भरती जागा निघाल्यावर पूनम नेफार्म भरला. परिक्षा दिली आणि पूनम एलिंजे मुलींमध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात पहिला येण्याचा मान पटकावला. तिला खूप खूप आनंद झाला. पूनम यशस्वी होण्यासाठी आई वडील प्रमाणे तिची मोठी बहिण प्रिती व प्रतिभा व भाऊजी व तिचा भाऊ सिध्दांर्थ यांचा खूप मोठ्ठा वाटा आहे. यांनी हिमतीनं बहिणींना शिक्षण देऊन मोठ्ठं केलं.
विशेष म्हणजे नाशिक पोलिसांनी पूनम एलिंजे हिच्या जिद्दीला व मेहनतीला सलाम केला! आजचं कोकण खेड गावात आल्यावर कु. पूनम एलिंजे चा कोकण खेड ग्रामपंचायत सरपंच मा.श्री. संदीप नारायण शिंदे अग्निपंख अकॅडमी तसेच प्रविण सुधाकर एलिंजे परिवारातर्फे व कोकण खेड महिला मंडळींने पूनम एलिंजे यांचे हार व पेढा भरवून कौतुक केले. तसंच यावेळी सर्वांनी खूप खूप अभिनंदन करून भविष्यात चांगलं कार्य करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या! 💐
सचिन सुधाकर एलिंजे बदलापूर महाराष्ट्र